“मिशन कवच कुंडल” मोहिमेत जिल्ह्यातील 27 हजार 678 नागरिकांनी घेतला विशेष कोविड लसीकरण मोहिमेचा लाभ
अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका):- “मिशन कवच कुंडल” या उपक्रमांतर्गत सोमवार, दि.11 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या “विशेष कोविड लसीकरण” मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील एकूण 307 लसीकरण केंद्रावर 13 हजार 507 पुरुष व 14 हजार 167 महिला तसेच इतर 4 असे एकूण 27 हजार 678 नागरिकांनी या विशेष कोविड लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.
“मिशन कवच कुंडल” अंतर्गत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा कोविड लसीकरणाची विशेष मोहीम राबवित आहे. या मोहिमेस संपूर्ण जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
*झालेल्या लसीकरणाची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:-*
अलिबाग- पुरुष 865, स्त्रिया 784 एकूण 1 हजार 649, कर्जत- पुरुष 901, स्त्रिया 1 हजार 277 एकूण 2 हजार 178, खालापूर- पुरुष 847, स्त्रिया 1 हजार 727 एकूण 2 हजार 577, महाड- पुरुष 745, स्त्रिया 793 एकूण 1 हजार 538, माणगाव- पुरुष 597, स्त्रिया 661 एकूण 1 हजार 258, म्हसळा- पुरुष 220, स्त्रिया 215 एकूण 435, मुरूड- पुरुष 227, स्त्रिया 475 एकूण 702, पनवेल ग्रामीण- पुरुष 1 हजार 608, स्त्रिया 1 हजार 843 एकूण 3 हजार 451, पेण- पुरुष 954, स्त्रिया 962 एकूण 1 हजार 916, पोलादपूर- पुरुष 147, स्त्रिया 83 एकूण 230, रोहा- पुरुष 691, स्त्रिया 967 एकूण 1 हजार 658, श्रीवर्धन- पुरुष 282, स्त्रिया 272 एकूण 554, सुधागड- पुरुष 270, स्त्रिया 312 एकूण 582, तळा- पुरुष 75, स्त्रिया 105 एकूण 180, उरण- पुरुष 807, स्त्रिया 623 एकूण 1 हजार 430, पनवेल महानगरपालिका शासकीय लसीकरण केंद्र- पुरुष 3 हजार 915, स्त्रिया 2 हजार 828 एकूण 6 हजार 744, खासगी लसीकरण केंद्र- पुरुष 356, स्त्रिया 240 एकूण 596, इतर 4
अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण 13 हजार 507 पुरुष व 14 हजार 167 महिला तसेच इतर 4 असे एकूण 27 हजार 678 नागरिकांनी या कोविड विशेष लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी “मिशन कवच कुंडल” या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या कोविड विशेष लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.