घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पनवेल(प्रतिनिधी) महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या 'बाप्पा मोरया घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे यांच्या उपस्थितीत आज (दि. १८) येथे करण्यात आले.