महालक्ष्मी हौसिंग सोसायटीची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आभासी पद्धतीने संपन्न
खारघर (प्रतिनिधी)-खारघरमधील सेक्टर-१५ येथील घरकुल काँम्प्लेक्समधील,"महालक्ष्मी हौसिंग सोसायटीची"१३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आभासी पद्धतीने शासनाचे सर्व नियम पाळून अत्त्यंत खेळीमेळीच्या वातावरणात काल रविवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सोसायटीच्या कार्यालयात पार पडली.
सभेचे अध्यक्षस्थान सोसायटीचे चेअरमन मा.श्री.प्रविण कदम यांनी भुषविले.झूम मीटद्वारे या सभेला ३५ सभासदांनी आपली उपस्थिती नोंविली तर कार्यकारी मंडळातील उपाध्यक्ष आप्पासाहेब मगर,सेक्रेटरी प्रदिप जाधव,खजिनदार सतीश मोरे,सहसचिव नितिन चव्हाण,सहखजिनदार सचिन नाक्ती,संचालक प्रकाश पांढरे आदी मान्यवर अध्यक्षांसमवेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित होते.सोसायटीचे मार्गदर्शक संचालक गुरूदत्त होळकर हे वैयक्तिक कारणांमुळे सोसायटीच्या कार्यालयात उपस्थित राहू शकले नाहीत;परंतु त्यांनी आभासी पद्धतीने सभेच्या कामकाजात पुर्णवेळ सहभाग नोंदविला आणि आपले मोलाचे मार्गदर्शन केले.
सभेचे कामकाज सेक्रेटरी प्रदिप जाधव यांनी अध्यक्षांच्या परवानगीने सुरू केले.प्रथम मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून आवाजी मतदानाने कायम करण्यात आला,तसेच व्यवस्थापक समितीचा सन २०२०-२०२१ सालचा वार्षिक अहवाल,जमा-खर्च पत्रक,नफा-तोटा पत्रक आणि ३१-३-२०२१ च्या ताळेबंदाला मंजुरी घेण्यात आली.त्यानंतर सन २०२०-२१ च्या लेखा-परिक्षण अहवालातील दोष-दुरूस्तीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.याबरोबरच सन २०२१-२२ या वर्षाकरिता लेखा-परिक्षकांची नियुक्ती करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला व कार्यकारी समितीने सोसायटीचे अद्ययावत कार्यालय बांधण्याच्या दिलेल्या प्रस्तावावरती विचारविनिमय करून खर्चाला मंजूरी घेण्यात आली.तसेच शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी आलेल्या सोसायटी आवारातील वाहन पार्किंगच्या विषयावरती धोरण ठरविण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.
अशा प्रकारे सभेचे कामकाज संपल्यानंतर सोसायटीचे खजिनदार श्री.सतीश मोरे यांनी संचालक मंडळाच्या वतीने सर्व उपस्थित सभासदांचे आभार मानले यानंतर राष्ट्रगीत झाले व चहा-पानानंतर सभा संपल्याचे अध्यक्ष प्रविण कदम यांनी जाहीर केले.अशा प्रकारे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली.