पनवेल शहरातील प्रमुख विसर्जन घाट वडाळे तलाव येथे महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पाहाणी केली
गणेश विसर्जन तयारीच्या अनुषंगाने पनवेल शहरातील प्रमुख विसर्जन घाट वडाळे तलाव येथे महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पाहाणी करून गणपती विसर्जनासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. विसर्जना दरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, मुख्य अभियंता संजय कटेकर आदी उपस्थित होते.