राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर; २६ सप्टेंबरला पनवेलमध्ये अंतिम फेरी
अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. मराठी भाषेत आयोजित करण्यात आलेली हि स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होत असून प्राथमिक फेरी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यामध्ये १०० जणांनी सहभाग घेतला. प्राथमिक फेरीचे परिक्षक म्हणून दिग्दर्शक, अभिनेते दीपक पवार आणि नकलाकार, अभिनेते श्रीनिवास लखपती यांनी काम पहिले. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी ऑफलाईन स्वरुपात पनवेलमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार आहे.
राज्यस्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धे तील प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय ०७ हजार, तृतीय क्रमांकास ०३ हजार रुपये, उतेजनार्थ एकूण ०२ पारितोषिके तर रायगड जिल्हास्तरीय अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ०५ हजार, द्वितीय ०३ हजार तर तृतीय क्रमांकास ०२ हजार रुपये, उतेजनार्थ एकूण ०२ पारितोषिके असणार आहेत.
राज्यस्तरीय प्राथमिक फेरी निकाल
प्रथमेश दिग्रजकर(नागपूर ), मृणालिनी वानखेडे (ऐरोली ), अजिंक्य टेकले (अंधेरी), गुरुप्रसाद गंगा(मुंबई), ज्योती उरणकर(पनवेल), कोमल वंजारे (कांदिवली), महेंद्र गोंदणे (भंडारा), मानसी पवार(घाटकोपर), निकिता झेपले(विले पार्ले), ऋतिका चाळके(दादर), आसावरी येवले (दादर), गायत्री नाईक (वसई), हनुमंत शिंदे (सातारा), परेश राजश्री(मुंबई), सावनी देशपांडे(सोलापूर), हर्षदा वाघ(पुणे), अतुल शिर्के (रत्नागिरी), साक्षी देशपांडे(ठाणे), सिद्दी पारकर (विले पार्ले), सुमित सावंत (दिवा), तृप्ती माळढोणकर (ठाणे), उमेश कांबळे (वसई), युवराज ताम्हणकर (पुणे), अमोघ देवस्थी (डोंबिवली).
रायगड जिल्हास्तरीय प्राथमिक फेरी निकाल
स्नेहल नरवडे (खांदा कॉलनी), उमेश वाळके (उसर्ली, पनवेल), प्रतीकेश मोरे (पळस्पे), ऋतुजा भगत (पनवेल), शर्मली केळकर (पनवेल), तेजश्री येरवळकर (नवीन पनवेल), अनिकेत गाडे(खांदा कॉलनी), जुई रानडे(पनवेल), कौस्तुभ सोमण (पनवेल), मुग्धा दातार (पनवेल), नील जाधव (सुकापूर), नितेश मानकामे (आदई), परीन मोरे (नवीन पनवेल), प्रीती मोरे (नवीन पनवेल), श्रीश म्हात्रे (उरण), श्वेता कुलकर्णी (नवीन पनवेल),