विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली विसर्जन घाटांची पाहणी
पनवेल : पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी गणेशोत्सव निमित्ताने वडाळे तलावाच्या विसर्जन घाटांची पाहणी केली. यावेळी पालिका अधिकाऱ्यांना कोविडच्या अनुषंगाने त्यांनी सूचना केल्या. यावेळी नगरसेविका डॉ सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज म्हात्रे, माजी नगरसेवक डीपी म्हात्रे, प्रकाश घरत, नरेश मुंढे, गणेश म्हात्रे, जॉनी जॉर्ज, अविनाश मकास, मंगेश अपराज, मंगेश भोईर, रोहन गावंड, सुरज बहाडकर, वैभव जोशी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.