पालिकेकडून हॉस्पिटलमध्ये पदभरती करताना कक्ष सेवकांची पदभरती करावी-विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
पनवेल : पनवेल पालिकेकडून हॉस्पिटलमध्ये पदभरती करताना त्यामध्ये कक्ष सेवकांची पदभरती करून कोविड काळात सेवा देणाऱ्या मुलांना न्याय देण्यात यावा असे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिकेचे आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.