रविवारी 'राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी
या अंतिम फेरीचे उद्घाटन सकाळी ०९ वाजता महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते तर पारितोषिक वितरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सायंकाळी ०६ वाजता होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिनेनाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, सभागृहनेते परेश ठाकूर तर सन्माननीय उपस्थिती म्हणून अभिनेते प्रभाकर मोरे व भरत साळवे यांची उपस्थिती लाभणार आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. मराठी भाषेत आयोजित करण्यात आलेली हि स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होत असून प्राथमिक फेरी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यामध्ये १०० जणांनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धे तील प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय ०७ हजार, तृतीय क्रमांकास ०३ हजार रुपये, उतेजनार्थ एकूण ०२ पारितोषिके तर रायगड जिल्हास्तरीय अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ०५ हजार, द्वितीय ०३ हजार तर तृतीय क्रमांकास ०२ हजार रुपये, उतेजनार्थ एकूण ०२ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.