वास्तु-विहार परिसरातील सर्व सोसायटीतील गणेशोत्सव मंडळांना नगरसेविका सौ संजना समीर कदम यांचा दीपज्योती (समई) वाटण्याचा अनोखा उपक्रम-कोकण म्हाडा मा. सभापती बाळासाहेब पाटील

वास्तु-विहार परिसरातील सर्व सोसायटीतील गणेशोत्सव मंडळांना नगरसेविका सौ संजना समीर कदम यांचा दीपज्योती (समई) वाटण्याचा अनोखा उपक्रम-कोकण म्हाडा मा. सभापती बाळासाहेब पाटील 



खारघर (प्रतिनिधी)- पनवेल महानगरपालिका नगरसेविका सौ संजना समीर कदम यांच्या माध्यमातून वास्तुविहार के एच २,पारिजात को ऑप हाऊसिंग सोसायटी,  वास्तुविहार के एच १ को ऑप हौसिंग सोसायटी, परिसरातील सर्व सोसायटीतील गणेशोत्सव मंडळांना दीपज्योति (समई) वाटपाच्या उपक्रमाची सुरवात सन्माननीय कोकण म्हाडा मा. सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व नगरसेविका सौ संजना समीर कदम यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मा.बाळासाहेब पाटील म्हणाले की,नगरसेविका सौ.संजना समीर कदम आणि मा.समीरजी कदम यांनी आपण राहात असलेल्या वास्तु-विहार,सेलिब्रेशन व घरकुल-स्पॕगेटी या मास हौसिंग काँम्प्लेक्समधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दीपज्योती (समई) वाटण्याचा हा कार्यक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.कदम दांम्पत्त्य नेहमीच असे वेगवेगळे अनुकरणीय उपक्रम राबवत असतात.त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.अशा नेतृत्वाच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहते.

    या कार्यक्रमासाठी मा. तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सदस्य प्रशांतजी कदम पनवेल शहर मा. सचिव प्रदीपजी देशमुख, देविदास खेडकरजी त्याचप्रमाणे वास्तुविहार के एच २ को ऑप हौसिंग सोसायटी चे अध्यक्ष समीरजी कदम, सचिव अरुण म्हात्रे, खजिनदार अजिनाथ वायभासे, उत्सव समितीचे सचिव मोहन मोरे, आदिनाथ डमाळे, युवा मोर्चा पदाधिकारी  सुशांत पाटोळे, प्रथमेश मोरे, अविनाश नलावडे,व सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते