क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या माध्यमातून नवीन पनवेल येथील MTNL जवळील झोपडपट्टीतील लहान चिमुकल्यांसमवेत रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला.

क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या माध्यमातून नवीन पनवेल येथील MTNL जवळील झोपडपट्टीतील लहान चिमुकल्यांसमवेत रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला


भाऊ आणि बहिणीचे नाते अतूट असे असते. याच नात्याचा उत्सव साजरा करणारा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा दिवस भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक या स्वरुपात साजरा केला जातो. यंदा जगभरात रविवारी म्हणजे २२ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा होत आहे. भाऊ आणि बहिणीचं नातं म्हणजे ‘तुझं-माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अगदी असंच असते. या सणाच्या निमित्ताने क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या माध्यमातून नवीन पनवेल येथील MTNL जवळील झोपडपट्टीतील लहान चिमुकल्यांसमवेत रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला.

झोपडपट्टीतील गरीब चिमुकल्या मुलांना राख्या बांधून व खाऊ वाटप करून खरंतर मनाला खूप आनंद वाटला आणि या दुर्लक्षित मुलांवर चांगले संस्कार व शिक्षण त्यांना मिळणे काळाची गरज असल्याचे लक्षात आले. त्यामुळेच त्यांच्या हातावर राखी बांधून त्यांना शिक्षण घेणे किती महत्वाचे आहे हे देखील पटवून दिले. सगळ्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे स्वतः शिकून स्वतः च्या पायावर उभे राहून उद्याचे भविष्य घडवण्याची जबाबदारी या मुलांची आणि त्यांच्या पालकांची आहे. हे त्यांना समजावून सांगितले याचा सार्थ अभिमान वाटला. आणि आपले बोलणे त्यांच्या लक्षात येऊन त्यांनीही मला चांगले शिक्षण घेऊन आपला पाया मजबूत करण्याचे वचन दिले हीच रक्षाबंधनची भेट आज मला मिळाली हे निश्चित झाले. तसेच आजचा आनंद ह्या लहान मुलांना गगनात मावेनासा झाला, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आजच्या दिवसाचे मोल खूप मोठे आहे हे जाणवले,

     त्यामुळेच या दिवसाचे महत्व खूप आहे. ह्या गरीब मुलांना ह्या जोपडपट्टीत कोणतीच सोय नाही ही समस्या सोडवण्याचे देखील आश्वासन दिले. 

बहिणीचे प्रेम आभाळाच्या मायेसारखे असते,

ती दूर असली तरीही दुःख नसते,

दुराव्यामुळे नाती होतात कमकुवत,

पण बहीण-भावाचे प्रेम,

कधीही कमी होत नाही...

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..

Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image