महाराष्ट्र प्रदेश भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या सचिवपदी मन्सूर पटेल

 महाराष्ट्र प्रदेश भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या सचिवपदी मन्सूर पटेल  



पनवेल(प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते मन्सूर पटेल यांची महाराष्ट्र प्रदेश भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख व मुंबई अल्पसंख्यांक वसीम खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 
          या नियुक्तीबद्दल मन्सूर पटेल यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची आज (मंगळवार) सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मन्सूर पटेल यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ कार्यकर्ते गुलजार पटेल, रायगड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस ऍड. इर्शाद शेख, उपाध्यक्ष नासिर नुरा शेख, तालुका अध्यक्ष मोसीन कर्नाळकर, शहर अध्यक्ष निसार सय्यद. माजी अध्यक्ष इम्तियाज बेग, दानिश बेग, पत्रकार वसीम पटेल, सउद शेख आदी उपस्थित होते.