सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांचा काळापिवळा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांचा काळापिवळा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई


पनवेल दि.17 (वार्ताहर)- पनवेल शहरातील पनवेल रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीन पत्त्यांवर काळापिवळा जुगार खेळणाऱ्या तिघांवर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

            गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी बेकायदेशीररित्या रस्त्यावर उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीन पत्त्यांवर काळापिवळा जुगार खेळला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त परिमंडळ-2 चे सोनावणे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने त्याठिकाणी छापा मारून रोशन भगत (वय-25), अभय कोळी (वय-36) व अब्दुल शेख (वय-52) या तिघांना ताब्यात घेऊन पत्त्यांच्या जोडसह रोखरक्कम असा मिळून 1600 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. याबाबत अधिक तपास पनवेल शहर पोलिस करीत आहेत.