संकल्प फाऊंडेशन व संस्कार अॅक्टिविटी सेंटर कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशात ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्ताने मदत उपक्रम

संकल्प फाऊंडेशन  व संस्कार अॅक्टिविटी सेंटर कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशात ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्ताने मदत उपक्रम



संकल्प फाऊंडेशन, कामोठे, पनवेल यांनी दिला महाडमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात, थेट विद्यार्थ्यांपर्यंत घरी पोहचून केली कर्तव्यपूर्ती..!


पनवेल(प्रतिनिधी) संकल्प फाऊंडेशन  व संस्कार अॅक्टिविटी सेंटर कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशात ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्ताने मदत उपक्रम राबविण्यात आले.         गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने बऱ्याच ठिकाणी अनेक शहरांची, गावांची अक्षरशः दुर्दशा केली आहे. महाड शहर तसेच महाड परिसर, खेड, चिपळूण, सांगली, कोल्हापूर आदी परिसरात महापुराचा फटका बसल्याने जनजीवन अत्यंत प्रभावित झाले आहे. या परिस्थितीत माणुसकीचा हात देण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्वयंसेवी संस्था पुढाकार घेताना दिसत आहेत.
       महाड परिसरात देखील महापुराने सगळच उध्वस्त केले आहे. दोन नद्यांच्या मध्ये सापडलेल्या ढालकाठी, बिरवाडी, भावे, वरंध या महाड तालुक्यातील पट्ट्यात देखील अनेकांना या महापुराचा भयंकर फटका बसला आहे. त्यामुळे या पट्ट्यातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना  वैशाली जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या संकल्प फाऊंडेशन, कामोठे, पनवेल यांच्या माध्यमातून कर्तव्यपूर्ती म्हणून मदत करण्यात आली.
     भावे या गावातील जाधव वाडी, पोळ वाडी, आदिवासी वाडी, सुतार वाडी, बौद्ध वाडी, चौधरीवाडी, गुरव वाडी, वजरवाडी, पदाचा कोंड, कीये आदी तसेच ढालकाठी मधील गणेशनगर वसाहत भागात संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून थेट बधितांच्या घरी मदत पोहचवण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वैशाली जगदाळे, उपाध्यक्ष मनीषा सिंग, खजिनदार गायत्री माने, सदस्य संजीवनी राणी, मच्छिंद्र कणसे, सुरेश साहू, विकास मळेकर तसेच भावे गावाचे सरपंच सौ. आशा जाधव, शिक्षक अमोल बुधवंत, समाजसेवक घाग साहेब, प्रकाश सुर्यवंशी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

काय होते या किट मध्ये :

वह्या, पुस्तके, कपडे, दप्तर, टिफीन बॉक्स, कंपास पेटी, पेन, पेन्सिल, रंगपेटी, लाँग बुक, ड्रॉइंग किट, औषधी, बिस्किट, स्वच्छ्ता सामुग्री, महिलांसाठी साडी, ब्लँकेट, टॉवेल, इनर वेअर, सुका खाऊ, फळे, अश्या विविध २२ वस्तूंचे १६००-१८०० रुपयांचे किट यावेळी या संस्थांमार्फत जवळपास २४० कुटुंबांना देण्यात आले.

होतकरू व कलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना दिली कौतुकाची थाप व विशेष भेट:- 
यावेळी उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा वैशाली जगदाळे यांनी परिसरातील हुशार व कलेची आवड असलेल्या मुलांशी संवाद साधला व त्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच पूरग्रस्त शाळांमधील सर्व संगणक संच दुरुस्त करून देण्याचे सूतोवाच केले.


चिमुकले भारावले :-
मदत देण्यासाठी बऱ्याच संस्था येतात परंतु त्या वर वर पाहून मदत करून निघून जातात. परंतु संकल्प फाउंडेशन, कामोठे, पनवेलच्या अध्यक्षा वैशाली जगदाळे मॅडम यांनी आम्हा बालकांशी चर्चा करून, आमच्या समस्या लक्षात घेऊन शैक्षणिक साहित्य, खाऊ, कपडे देऊन थेट भरघोस मदत केली. त्यांनी दिलेली भेट आमच्यासाठी अनमोल होती. त्यांचा विश्वास आम्ही सार्थकी लावू. गावकऱ्यांनी त्यांच्या सत्कार देखील केला. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करणारे अमोल बुधवंत सर यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो.
- श्रेयस पारटवाड, विद्यार्थी

शिक्षकांनी व शिक्षणप्रेमी यांनी केले नियोजन :- 

संकल्प फाउंडेशन यांनी केलेले शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य प्रबोधन, स्वच्छ्ता अभियान याचे नियोजन शिक्षणप्रेमी श्री. प्रकाश सुर्यवंशी, श्री. घाग साहेब व जिल्हा परिषद शाळा भावेचे मुख्याध्यापक अनिल चीनके, सुरेश कवडे, शिक्षक अमोल बुधवंत, नागनाथ सरक यांनी केले. तसेच पारटवाड सर, मेंगडे सर, सुधीर सरक आदी यांनी मदत केली.

" आम्हाला मिळालेला निधी आणि देणगीदार यांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरविण्यासाठी खऱ्या गरजवंतांच्या थेट घरी पोहचून आम्ही मदत सुपूर्द केली. संस्थेचे सदस्य यांनी या काळात घेतलेल्या अपार मेहनतीमुळे केवळ हे शक्य झाले. "
-  वैशाली जगदाळे, अध्यक्ष संकल्प फाउंडेशन

-ठळक मुद्दे :

• थेट बाधित भागात २४० कुटुंबीयांना मदत
• वह्या, पुस्तके, कपडे, दप्तर, टिफीन बॉक्स, कंपास पेटी, ड्रॉइंग किट, औषधी, खाऊसह २२ वस्तूंचे १६००-१८०० रुपयांचे मदत किट केले सुपूर्द.
• आरोग्य प्रबोधन, स्वच्छता मोहीम, शैक्षणिक प्रबोधन राबवून चिमुकल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली मदत
• गावकऱ्यांनी केला संकल्प फाऊंडेशन, कामोठे, पनवेल संस्थेचा सत्कार
• संकल्प फाऊंडेशन, कामोठे, पनवेल चे अध्यक्ष वैशाली जगदाळे यांचे ग्रामस्थांनी मानले आभार