भटक्या कुत्र्यांच्या नावाने ब्लॅकमेलिंग करणारी टोळी पनवेल मध्ये सक्रिय
पनवेल /प्रतिनिधी
आपण किती प्राणी मित्र आहोत हे दाखवण्यासाठी भटक्या कुत्र्यांना पाच दहा रुपयांची बिस्किटे ,खरकटे उरलेले अन्न रस्त्यावर टाकून कुत्री जमवायची आणि आपण किती प्राणी मित्र आहोत हे दाखवायचे ,मात्र रस्त्यावर कुत्री जमवल्याने वाहनांना,पादचाऱ्यांना हि कुत्री चावतात गाडी च्या मागे लागतात मग त्यात एखादा कुत्रा अपघाताने गाडी खाली आला तर हे काही भामटे प्राणी मित्र सांगणारे तिकडेच टवाळक्या करीत असतात मग कुत्र्या ला इजा झाली भरपाई द्यावी लागेल नाहीतर पोलिसांकडे तक्रार करतो अशा धमक्या देत सर्वसामान्य नागरिकाला मोठमोठे कलमांची भीती सांगून ब्लॅकमेलिंग करून घाबरवून सोडतात यामध्ये प्राणी मित्र संघटना ,आणि ती टोळी यांची मिलीजुली असल्याने घाबरवून त्याच्याकडून पैशाची मागणी करून लूट करीत आहेत .
पनवेल परिसरात दिवसेंदिवस रस्त्यावर भटकी कुत्री वाढत आहेत ,हि भटकी कुत्री वाढण्याचे कारण म्हणजे मुंबई ,व अन्य भागातून पनवेल परिसरात अनेक कुत्रे रात्री अपरात्री आणून सोडणारी टोळी सक्रिय आहे ,ह्या भटक्या कुत्र्यांना मग बेगडी प्रेम दाखवणारे प्राणी मित्र जागे होतात आणि मग त्यांना घरातील उरलेसुरले खरकटे अन्न रत्यावर खायला टाकून आपल्याला किती प्राणी प्रेम आहे मुक्या जनावरांविषयी किती आत्मीयता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात ,मात्र बेगडी प्रेम दाखवणाऱ्या काही प्राणी प्रेमींचा यामागचा अर्थार्जनाचा उद्देश असल्याने ते अशा कुत्र्यांना रस्त्यावर मोकाट ठेवत आहेत ,या कुत्र्यांना कोणी हटकण्याचा प्रयत्न केला तर लगेच हि टोळी समोर येऊन दमदाटी करते ,तर या भटक्या कुत्रांच्या अंगावरून एखादी दुचाकी अथवा चार चाकी वाहन गेल्यास अथवा थोडा तरी धक्का लागल्यास हि टोळी गाडी अडवून त्या वाहन चालकाला दमदाटी करीत मारहाण करीत आमच्या कुत्र्याचा अपघात केलास मुक्याप्राण्याला इजा केली म्हणून पैशाची मागणी करून लूट करीत आहेत .जर पैसे दिले नाही तर प्राणी मित्र संघटना येऊन मग अशा कलमांतर्गत तशा कलमांतर्गत कारवाई होऊ शकते असे घाबरवून मोट्या रकमेची मागणी करतात ,वेळ प्रसंगी मारझोड करतात , अशा भटक्याकुत्र्यांच्या नावाने लूट मार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त केला पायजे .
रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होऊन जीव गमवावा लागला आहे .तर अनेक लहान मुलांचे लचके या भटक्या कुत्र्यांनी घेतेले आहेत ,अनेक जेष्ठ नागरिक या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत .मात्र हे बेगडी प्रेम दाखवणारी टोळी याना कधी स्वतःच्या घरात आसरा देत नाहीत ,कि त्यांचे वेळोवेळी रेबीज लसीकरण करीत नाहीत ,अपघात झाल्यास माझा पाळलेले कुत्रा होता असे सांगताना ते कुत्राची नोंद महापालिकेकडे करण्याचे विसरतात ,त्यांना बाहेर असताना तोंडाला पिशवी लावण्याचे जाणीवपूर्वक नियम विसरतात ,त्याचे लसीकरण विसरतात ,ऍनिमल वेल्फेर बोर्ड ऑफ इंडियाची नोंदणी करीत नाहीत . शासनाचे प्राण्यांविषयी नियमांना बगल देत फक्त आपला धंदा सुरु राहावा म्हणून रस्त्यावर कुत्री जमवून सर्वसामान्यांची लूट करीत असलेल्या काही प्राणी मित्र संघटना यांच्या सारख्या टोळी ला वेळीच प्रतिबंध करावा लागेल हा बेकायदेशीर धंदा फोफावून अनेक निरपराध चिमुकल्याना प्राण गमवावे लागतील , भटक्या कुत्र्यांना आणि त्यांच्या वर लूट मार करणाऱ्या काही बेगडी कुत्र्यांच्या प्राणी मित्र स्वतःला समजून घेणाऱ्या टोळी मुळे दहशतीमुळे सर्वसामान्यांचे रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल .