शब्दशिल्प कलाविष्कार संघ आयोजित प्रथम राज्यस्तरीय ऑनलाईन आषाढसरी काव्य संमेलन उत्साहात संपन्न
अलिबाग:(सचिन पाटील)शब्दशिल्प कलाविष्कार संघ आयोजित राज्यस्तरीय प्रथम ऑनलाईन काव्यसंमेलन दिनांक २५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी चार ते साडे सात या वेळात गुगल मीटवर आयोजित करण्यात आले होते. ह्या संमेलनाचे अध्यक्षस्थान कवी अँड. रूपेश पवार यांनी भूषविले. संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री अनिता आबनावे, कवयित्री रंजना बोरा, कवी संदीप जगताप उपस्थित होते. निमंत्रित मान्यवर कवी/कवयियत्री सुशीला पिंपरीकर, शोभा कोठावदे, आम्रपाली घाडगे, कालिंदी वाणी, मयूर पालकर, प्रतिभा विभूते यांनी विविध विषयावर उत्कृष्ट रचना सादर करून काव्य संमेलनाची रंगत वाढवली. ह्या काव्यसंमेलनात कवयित्री अंकिता ठाकूर यांच्या मावळतीची फुले ह्या काव्यसंग्रहाचे, तसेच कवयित्री अलका येवले यांनी संपादित केलेल्या अलकांती नावाच्या ई काव्यसंग्रहाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष कवी अँड. रूपेश पवार यांनी व स्वागताध्यक्षा कवयित्री अलका येवले यांनी केले. कवयित्री अंकिता ठाकूर यांच्या काव्यसंग्रहाच परीक्षण करून ते प्रसिद्ध करायला आवडेल असे उद्गार संमेलनाध्यक्ष कवी रूपेश पवार यांनी काढले. तसेच अलकांती ई काव्य संग्रह लवकरच सारस्वतांना वाचायला मिळेल असे प्रतिपादन कवयित्री अलका येवले यांनी केले. शब्दशिल्प कलाविष्कार संघ लवकरच प्रकाशन संस्था म्हणून नोंदणी करवून त्याद्वारे अनेक काव्यसंग्रह तथा पुस्तके प्रकाशित केली जातील तसेच शब्दशिल्प कलाविष्कार संघ आयोजित दर महिन्याला एक अंक प्रकाशित करणारे मासिक शब्दशिल्प संजीवनी ह्या नावाने पंधरा ऑगस्टपासुन सुरू करण्यात येणार आहे आणि भविष्यात तो प्रत्येक महीन्यात प्रकाशित करण्यात येईल. तसेच शब्दशिल्प कलाविष्कार संघातर्फे दिपावली विशेषांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे असेही जाहीर केले गेले. ह्या काव्यसंमेलनासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून पंचेचाळीस कवी व कवयित्री यांनी विविध विषयावर स्वरचित कविता सादर करून संमेलनाची रंगत वाढवली. संमेलनात सहभागी कवी/कवयित्री कालिंदी वाणी, रजनी येवले, मिनल बधान, संध्याराणी कोल्हे उषाश्री बागडे, गोवर्धन बिसेन, भाग्यश्री बागड, भाक्ती काळे, विद्या कुलकर्णी, शशीकला वाणी,मिरा खंडागळे, कल्पना महाजन, रेखा मालपुरे, वैशाली गोल्हार, अर्चना ब्राम्हणकार, विनीता कोठावदे, मंदा पवार, अलका पितृभक्त, सपना भामरे, आशा शिरूडे, सुलभा बाविस्कर, अनिता दशपुते, सरला सोनजे, निता शेंडे, प्रतिभा वाणी, सुनंदा सोनजे, वंदना पाटणे, अर्चना नावरकर, मनिषा वाणी, नीरज शेळके, प्रल्हाद घोरबांड, प्रशांत शेरे, रमेश पाटोळ, अकबर ममदुले, हिना शेख, नील सोनटक्के, रोहिणी येवले ह्या सर्वांनी सादरीकरण विविध प्रकारच्या काव्यप्रकारात केले जसे की अष्टाक्षरी काव्य, मुक्त काव्य, भारूड, प्रेमकाव्य, गीत, काव्यांजली, आषाढसरी काव्य संमेलन हाक्षविषय असल्याने पावसावर विशेषता जास्त कविता सादर केल्या गेल्या. ह्या सुंदर सोहळ्याचे उत्कृष्ठ आयोजन अवघ्या दोन दिवसात शब्दशिल्प कलाविष्कार संघ अध्यक्षा सौ अलका येवले, कार्याध्यक्षा सौ गीतांजली वाणी व उपाध्यक्ष श्री राहूल मुंढे यांनी केले होते. सौ योगिता तकतराव आणि सौ कल्पना पाटकर यांनी सुमधूर आवाजात निवेदन करून काव्य संमेलन बहारदार बनविले. काव्य संमेलनासाठी कवी मयूर पालकर, सौ आशा अमृतकर, सौ विनीता कोठावदे, सौ भाग्यश्री बागड, सौ उषाश्री बागडे, सौ रेखा मालपुरे यांचे विशेष सहकार्य लाभले.