माहिरा हेल्प फाऊंडेशनच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी नितीन सोमण तर महिला जिल्हाध्यक्षपदी रिमा रावल
सुकापूर येथील स्पाईसवाडीहॉल मध्ये झालेल्या या कार्यक्रमास माहिरा फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश पांडे, संचालक धर्मेंद्र उपाध्याय, श्री गोविंद, राहुल उपाध्याय यांच्यासह ममता शुक्ला, रजनी सिन्हा, रेखा भगत, अनिता पाटील, सुनीता डोलेकर, चित्रा देशमुख, यमुना प्रकाशन, चांदणी मॅडम, इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दिनेश पांडे यांनी माहिरा फाऊंडेशनच्या कार्याची माहिती विशद केली.
यावेळी उपस्थितांनी नितीन सोमण आणि रिमा रावल यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी माहिरा फाऊंडेशनचे कार्य जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.