रायगड जिल्हा परिषदेच्या मुकबधिर विद्यालयाचे भूमिपूजन संपन्न


रायगड जिल्हा परिषदेच्या मुकबधिर विद्यालयाचे भूमिपूजन संपन्न


अलिबाग :

रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने विद्यानगर येथे शासकीय मूकबधिर विद्यालयाचे भूमिपूजन रविवारी (ता.१५) पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले. मूकबधिर विद्यालयाची नवीन इमारतीसाठी २ कोटी ४६ लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे.

विद्यानगर येथे १९८३ पासून शासकीय मूकबधिर विद्यालय आहे. मात्र या इमारतीची दुरावस्था झाल्याने जुनी इमारत पाडून नवीन झमारत बांधण्यात येत आहे. यासाठी २ कोटी ४६ लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. नवीन इमारत एकमजली असून, यामध्ये शाळेचे कार्यालय, वर्ग खोल्या, निवास व्यवस्था, भोजनालय असणार आहे.

नवीन इमारतीचे भूमिपूजन सोहळ्यासाठी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, शेकाप पक्षप्रतोद अस्वाद पाटील, शिवसेना पक्षप्रतोद मानसी दळवी, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, चेंढरे ग्रामपंचायत सरपंच स्वाती पाटील, समाजकल्याण अधिकारी गजानन लेंडी, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता के. वाय. बारदस्कर यांच्यासह जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.