साईनगर- कर्नाळा स्पोर्ट्स जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू, नागरिकांनी मानले श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांचे आभार

साईनगर- कर्नाळा स्पोर्ट्स जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू, नागरिकांनी मानले श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांचे आभार


नवीन पनवेल : साई नगर येथून कळंबोली ला कर्नाळा स्पोर्ट्स मार्गे  जाण्यासाठी  पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत कच्चा रस्ता आहे. सदरचा रस्त्याच्या आजूबाजूला अपटाऊन अवेन्यू ,सुशील ब्लॉसम, दुर्वांकुर, सुशील रुक्मिणी इमारती आहेत सदर इमारतीत एकंदरीत हजार ते बाराशे लोकवस्ती आहे. तसेच सदरचा रस्ता साईनगर वासियांना पनवेलच्या बाहेर जाण्यासाठी सोयीचा असल्याने या रस्त्यावर सतत रहदारी असते. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले त्यामुळे तेथील रहिवासी यांनी विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांचे आभार मानले.

          परंतु पावसाळ्यात सदर रस्त्यावर आजूबाजूच्या प्लॉटवरील पाणी साचत असल्यामुळे बरेच ठिकाणी रस्ता फुटलेला आहे , त्यामुळे त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तेथे राहणाऱ्या रहिवासीयांनी पत्राद्वारे विरोधी पक्षनेते श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिका यांना सदरची समस्या सांगितली. त्यात त्यांनी या रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष घालून सदर खड्डे त्वरित भरून  देण्यास सहकार्य करून त्या विभागातील रहिवाशांची सदर रस्त्यावरील प्रवासादरम्यान होणारी गैरसोय टाळावी अशी विनंती केली.
       रहिवाशांनी केलेल्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत विरोधी पक्षनेते श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी संबंधित विभाग अधिकाऱ्यांकडून सदर रस्त्याची पाहणी करून नागरिकांना होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करावी अशी सूचना केली. त्यानुसार पनवेल महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी पाहणी केली याप्रसंगी स्थानिक रहिवासी शेकाप युवानेते श्री मंगेश अपराज, श्री अविनाश मकास , श्री.रोहन गावंड ,श्री.भाई म्हात्रे, श्री अशोक म्हात्रे व सोसायटी मधील रहिवासी उपस्थित होते. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले त्यामुळे तेथील रहिवासी यांनी विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांचे आभार मानले.