सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे व टाटा कॅपिटल सहकार्याने, तालुक्यातील 14 माध्यमिक शाळेंतील पितृछत्र हरपलेले, दिव्यांग व गोरगरीब विद्यार्थ्यांना पुस्तके वह्या तसेच शालोपयोगी साहित्य वाटप
सुधागड ः ठाण्यातील सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे ही सेवाभावी संस्था गेली 45 वर्षे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. यंदा भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सुधागड तालुक्यातील पाली येथील ग. बा. वडेर हायस्कूलमध्ये तालुक्यातील 14 माध्यमिक शाळेंतील पितृछत्र हरपलेले विद्यार्थी, दिग्यांग व गोरगरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य, वह्या-पुस्तके यांचे वाटप 15 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आले. यावेळी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल बाबू घाडगे यांनी सांगितले की, 1) तालुक्यातील गोर गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुस्तके, वह्या, दप्तर फी देणे. 2) मुलांच्या गुणवंता वाढावी म्हणून विविध वाचनीय पुस्तके देऊन वाचनालय समृद्ध केले, विविध स्कॉलरशिप परीक्षेस बसण्यासाठी पुस्तके, परीक्षा फी व मार्गदर्शन करणे. 3) विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी तालुकास्तरीय शैक्षणिक व क्रीडा स्पर्धा सुरू करून त्यासाठी लागणारे शैक्षणिक व क्रीडा साहित्य प्रत्येक शाळांना पुरविणे. वरील कार्य आमची संस्था मागील 5 वर्ष करत असून त्यासाठी लागणारा निधी टाटा कॅपिटल देत आहे आम्ही त्यांचे ऋणी आहोत. सर्व मुख्याध्यापक व शिक्षकाने आवाहन केले की, शाळेना दिलेल्या साहित्याचा योग्य वापर मुलांच्या प्रगतीचा अहवाल वेळीवेळो सादर करावा संस्था आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्ध आहे. टाटा कॅपिटलने संस्थेला केलेल्या भरीव सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त करीत यापुढे चांगला सीएसआर फंड मिळविण्यासाठी संस्थेच्या मिळत असलेल्या लाभाची सविस्तर माहिती संस्थेकडे जमा करण्याच्या त्यांनी सर्व शाळांतील मुख्याध्यापक व प्रतिनिधींना केले आहे.
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ठाण्यात राहणारे सुधागड तालुकावासी बांधवांनी तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात राहणार्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासासाठी शालोपयोगी साहित्य वाटप व पितृछत्र हरपलेले विद्यार्थी, दिव्यांग- गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ग. बा. वडेर हायस्कूल, पाली येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी सर्व शाळांचे समन्वयक ज्येष्ठ आदर्श शिक्षक निंबाळकर सर यांनी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटलचे आभार व्यक्त करीत शाळांना मिळत असलेल्या शैक्षणिक साहित्यांचा व स्पर्धा परिक्षा पुस्तके व खेळांचे साहित्या यांचा त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वागिेण विकासासाठी योग्य वापर करून त्याची पोचपावती म्हणून उद्याचा उज्वल भविष्य घडविणारा विद्यार्थी निर्माण करावा, असा आशावाद निंबाळकर यांनी व्यक्त केला. तसेच शिक्षकांच्या वतीने माळी सर, नरेश शेडगे सर आदींनी आपले विचार मांडताना संस्थेने केलेल्या मदतीचा विद्यार्थाना कसा उपयोग झाला हे उदाहरणे देऊन सांगत संस्थेच्या कार्याचे कौतूक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सरचिटणीस राजू पातेरे यांनी आभार व्यक्त करीत कार्यक्रमाचा समारोप केला.
ग.बा. वडेर शाळेत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे ग. ब. वडेर चे शिक्षक श्री सुजित जगतापसुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल खेरटकर, उपाध्यक्ष शंकर काळभोर, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, ज्येष्ठ सल्लागार शिवाजी दळवी, सरचिटणीस राजू पातेरे, खजिनदार विजय पवार, उपखजिनदार विजय जाधव, अंतर्गत हिशेब तपासणीस दत्ता सागळे, सांस्कृतिक समिती प्रमुख रघुनाथ इंदुलकर, ज्येष्ठ सल्लागार जर्नादन घोंगे, प्रसिद्धीप्रमुख अजय जाधव, कार्यकारी सदस्य दत्ता दळवी, ज्येष्ठ पत्रकार संतोष उतेकर, पत्रकार संदेश उतेकर आदींची उपस्थिती लाभली.