महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या दर्जेदा पुस्तकाच्या यादीत लेखिका सौ.अरुणा अजित भागवत यांच्या दोन पुस्तकांची निवड
मुंबई/प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या ग्रंथ निवड समितीने २०२३ मध्ये प्रकाशित उत्तम, दर्जेदार ग्रंथांची यादी जाहीर केली आहे. या उत्तम, दर्जेदार ग्रंथांच्या यादीत रायगड येथील लेखिका सौ अरुणा अजित भागवत यांची इसाप प्रकाशन,नांदेड यांनी प्रकाशित केलेली दोन पुस्तके निवडण्यात आली आहेत आय. एस. बी. एन. नंबर असलेली तसेच उत्तम साहित्य ,सकारात्मक विचार करायलाशिकविणारी आणि व्यक्तिमत्त्व विकासाला मदत करणारी पुस्तके वाचकांना मिळावीत यासाठी या पुस्तकांची निवड करण्यात आलेली आहेत.यामध्ये रायगड जिल्ह्याच्या ख्यातनाम लेखिका सौ अरुणा अजित भागवत यांची 2023 मध्ये प्रकाशित झालेली दोन पुस्तके गुलाम (कथासंग्रह) आणि जंतर मंतर छू ( बालकथासंग्रह) हे निवडण्यात आले आहेत.

