ईद-ए-मिलादच्या दिवशी ‘ड्राय डे’साठी एमआयएम आग्रही

 ईद-ए-मिलादच्या दिवशी ‘ड्राय डे’साठी एमआयएम आग्रही

नवी मुंबई : ईद-ए-मिलादच्या दिवशी महाराष्ट्र सरकारने ‘ड्राय डे’ जाहिर करण्याची लेखी मागणी नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एमआयएमचे प्रभारी आणि एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

येत्या ५ सप्टेंबर २०२५ रोजी बिअर बार, वॉईन शॉप बंद ठेवण्यासाठी ईद-ए-मिलाद (किंवा मिलाद उन-नबी) हा मुस्लिम धर्मियांचा दिवस सण आहे. या दिवशी मुस्लिम धर्माचे संस्थापक पैगंबर हजरत मुहम्मद यांचा जन्म झाला होता. या दिवशी लोक नवीन कपडे परिधान करतात, मशिदींमध्ये जाऊन विशेष नमाज अदा करतात आणि या विशेष प्रसंगी एकत्र येऊन पैगंबरांना श्रद्धांजली अर्पण करतात. या दिवशी विशेष प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनावर आणि शिकवणींवर चर्चा केली जाते. मुस्लिम समुदाय या दिवशी आनंद व्यक्त करतो आणि नवीन कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी कोणी दारु पिवून कोणत्याही प्रकारची चुकीची घटना घडू नये, धार्मिक भावना दुखावण्याची घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी राज्य सरकारने ईद-ए-मिलाद (किंवा मिलाद उन-नबी)च्या दिवशी ड्राय डे जाहिर करणे आवश्यक आहे. कोणी दारु पिवून या दिवशी कार्यक्रमामध्ये गोंधळ केल्यास धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर या पवित्र दिवशी महाराष्ट्र सरकारने ‘ड्राय डे’ घोषित करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.