लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खारघर येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रम

 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खारघर येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रम




पनवेल(प्रतिनिधी) 
गोरगरिबांचे कैवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खारघर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आणि खारघरचा राजा मंडळाच्या वतीने खारघर येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून साहित्याचे वाटप केले आणि कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी नुकतीच वयाची वर्षे पूर्ण केली असून, त्यांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने खारघर शहरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले, तर गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, खारघरचा राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील, वनिता पाटील, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, युवा मोर्चा अध्यक्ष मितेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image