लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त पनवेलमध्ये "जोड भजनी भारूड"
पनवेल शहरातील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात (आगरी समाज हॉल) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी वडगाव गायक राजेंद्रबुवा जांभुळकर, सुभाष मुकादम व अनिल मुकादम यांचा जोड भजनाचा कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल -उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल दि. बा. पाटील तसेच पदाधिकाऱ्यांनी केले आहे.