सोन्याची चैन प्रामाणिकपणे परत केली : पनवेल महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक


सोन्याची चैन प्रामाणिकपणे परत केली : पनवेल महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक


पनवेल, दि. १४ : वडाळे तलाव परिसरात सकाळी जॉगिंगसाठी येणाऱ्या एका नागरिकाची सोन्याची चैन हरवल्याची घटना घडली. मात्र प्रभाग क्रमांक १८ मधील स्वच्छता कर्मचारी श्री. विश्वनाथ पाटील यांनी आपली प्रामाणिकता दाखवत ती चैन संबंधित व्यक्तीपर्यंत परत पोहोचवली.

वडाळे तलाव परिसरात सकाळी स्वच्छतेचे काम करत असताना  स्वच्छता कर्मचारी श्री. विश्वनाथ पाटील यांना सोन्याची चैन सापडली. त्यांनी तत्काळ ती वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहानिशा करून हरवलेली वस्तू संबंधित नागरिकाला परत केली.

या प्रामाणिक व जबाबदार कृत्याबद्दल श्री. पाटील यांचे महापालिका प्रशासनाच्यावतीने कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या वर्तनामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळाले असून, समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.