भारतीय जनता पार्टी श्री. प्रितम म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन

 माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांच्यात सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत - लोकनेते रामशेठ ठाकूर 




भारतीय जनता पार्टी श्री. प्रितम म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन 


पनवेल (प्रतिनिधी) माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आणि युवा नेते प्रितम म्हात्रे हे समाजकार्यात अनेक दशके कार्यरत असून त्यांच्यात सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत आहे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज येथे केले. पनवेल शहरातील गुरुशरणम सोसायटीमध्ये भारतीय जनता पार्टी श्री. प्रितम म्हात्रे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले असून या कार्यालयाचे उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 
          या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेवक बबन मुकादम, पनवेल मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, कर्नाळा मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, न्हावे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, रामेश्वर आंग्रे, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहोकर, सारिका भगत, पुष्पलता मढवी, सीमा घरत, सरस्वती काथारा, लीना पाटील, रमाकांत म्हात्रे, गौरव कांडपिले, यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
           लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगात सर्वात चांगला नेता म्हणून नाव आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सक्षम नेतृत्व करत असल्याचे सांगितले. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष शेवटी स्वतः असे भाजपचे तत्व आहे, त्यामुळे देशप्रेम प्रथम अशी महत्वाची मूल्य असून भारतीय जनता पक्षात काम करेल त्याला संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले. १० मे रोजी प्रवेश झाला आज २२ मे पण तुम्ही थांबलात नाही अवघ्या दहा बारा दिवसात तुम्ही भाजपची मूल्ये आत्मसात केली असे सांगतानाच प्रितम म्हात्रे धडाडीचा कार्यकर्ता आहे त्यामुळे त्याला पुढे मोठी संधी आहे. शेकाप भाजप म्हणून आमची मतभेद झाले पण जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे राजकारण विरहित काम करतात त्यामुळे त्यांच्यासोबत कधीही दुजाभाव झाला नाही., असे त्यांनी अधोरेखित केले. खुर्ची कामा करता असते मानाकरिता नाही, या कार्यालयात मुख्य खुर्ची प्रितम म्हात्रे यांची असणार आहे मात्र ते खुर्चीत न बसता उभे आहेत, असे सांगत कौतुक केले.  पनवेलमध्ये मुख्य तीन कार्यालय झाली आहेत, प्रत्येक नगरसेवकाचे व्यक्तिगत कार्यालय आहे.आता आणखी मोठे कार्यालय डेरिवली येथे होत आहे. या कार्यालयातून लोकांची सेवा कायम झाली पाहिजे त्यासाठी  सर्वानी एकदिलाने काम करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. जो काम करेल तो पुढे जाईल त्यामुळे आपले कुटुंब सांभाळत पक्षाचे आणि प्रामुख्याने देशहिताचे सर्वानी काम करावे, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. 
यावेळी प्रितम म्हात्रे यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच आपल्या भाषणातून पक्षाचे कार्य अधिक जोमाने करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी आमदार विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी याचीही भाषणे झाली. तर प्रास्ताविक माजी नगरसेवक गणेश कडू यांनी केले. यावेळी शेकापचे खांदा कॉलनी अध्यक्ष जयंत भगत, कामोठे शहर प्रमुख संघटक अल्पेश माने, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेश खरात, खांदा कॉलनी महिला अध्यक्ष निर्मला गुंडरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.  


Popular posts
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image