पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली

पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली


पनवेल,दि.22: महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर विभागातील पेंधर गावामध्ये दिनांक 21 मे रोजी रात्री मुख्य रस्त्यावर महावितरण कंपनीची विद्युत वाहिनीचा प्रवाह सुरू असलेला कंडक्टर रस्त्यावर तुटून पडला होता. त्याचवेळी  मनपा विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील काही कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्याच भागात गेले असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांना संभाव्य दुर्घटनेची भीषणता लक्षात येताच त्यांनी  तत्परतेने पालिकेच्या विद्युत विभागातील पर्यवेक्षक रोहन भोईर यांना तातडीने बोलवून सदरच्या कंडक्टर मधून चालू असलेला विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितले. त्यांच्या  तत्परतेमुळे मोठी विद्युत दुर्घटना टळली.

या सर्व प्रकरणाबाबत महावितरण कंपनीस अवगत करुन पुढील,कार्यवाही करण्यात आली.

     या कार्य तत्परतेबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रीतम पाटील यांचे अभिनंदन केले.


महावितरण विभागाने मानले आभार

      पेंधर हे गाव महावितरण कंपनीच्या नावडे विभागात येते . काल दिनांक २१मे  रोजी रात्री पावसात विद्युत वाहिनीचा कन्डक्टर तुटून पडला, ही बाब विद्युत विभाग प्रमुख  प्रितम पाटील यांच्या निदर्शनास आली. श्री. पाटील यांनी प्रसंगावधान राखून मनपाच्या विद्युत कर्मचाऱ्यांना सुचना देऊन विद्युत वाहिनीचा वीजपुरवठा खंडित करणेबाबत तत्पर कार्यवाही केली.तसेच महावितरण कंपनीकडे संपर्क साधला.परिणामी विद्युत अपघातामुळे होणारी जीवितहानी टळली आहे.महावितरण कंपनीने याबाबत मनपाचे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Popular posts
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
भारतीय जनता पार्टी श्री. प्रितम म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image