शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त स्वस्तिका घोषचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक

शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त स्वस्तिका घोषचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक 



पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील प्रतिष्ठित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिला नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले असून पुरस्कार मिळाल्यानंतर आज स्वस्तिका घोष हिने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट आशीर्वाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचे अभिनंदन करून तिला पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 
         आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वस्तिका घोष ही जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) बीएमएसचे शिक्षण घेत आहे. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले असून गेल्या दहा वर्षांपासून ती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील तिचे प्रशिक्षक असून टेबल टेनिससाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाला वेळोवेळी आर्थिक मदत करण्याबरोबरच प्रशिक्षणासाठी खारघर येथील विद्यालयात विशेष सोय केली आहे. स्वस्तिकाने आपल्या खेळात सातत्य ठेवत एक एक टप्पा सर करत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी काम केले आहे. तसेच पनवेलच्या स्वस्तिका घोषने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळवून संपूर्ण पनवेलकरांचे नाव उज्ज्वल केले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तिच्या परिश्रमाचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, सीकेटी (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, जी. के. सुर्वे, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक, स्वस्तिकाचे वडील संदीप घोष आदी उपस्थित होते.  

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image