वशेणी प्रिमियर लीग २०२५” चे आयोजन, प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती
पनवेल : श्री दत्तगुरु क्रिकेट क्लब वशेणी यांच्या वतीने “वशेणी प्रिमियर लीग २०२५” चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शेकापचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून सर्व संघांना शुभेच्छा दिल्या.
या ठिकाणी करण्यात आलेली धावपट्टी आणि इतर नियोजन उत्तम होते. आपल्या मातीतील खेळाडूंना चांगल्या प्रकारे त्यांची कामगिरी बजावताना पाहण्याची रायगड मधील क्रिकेट रसिकांना खूप चांगली संधी आहे.
यावेळी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत .एम.एन.म्हात्रे (मा. शिक्षणाधिकारी), श्री.संग्राम पाटील, श्री.सुनिल ठाकूर, श्री.रत्नाकर गावंड, श्री.ए. बी.तांडेल, श्री.हसूराम म्हात्रे, डॉ.विश्राम गोंधळी, श्री.काशिनाथ पाटील, श्री.बाबुराव म्हात्रे, श्री.देवानंद पाटील, श्री.बळीराम पाटील, श्री.निखिल ठाकूर, श्री.ऋषीकेश पाटील, श्री.संजोग पाटील, श्री.धीरज म्हात्रे, श्री.करण ठाकूर उपस्थित होते.