कु.देवश्री प्रशांत शेडगे हिचा विदेशात डंका; कॉम्प्युटर क्राऊड मद्धे मास्टर करून पनवेल च्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
पनवेल् (प्रतिनिधी) पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांची कन्या कु.देवश्री प्रशांत शेडगे ही गेले वर्षभर आयरलंड येथे कॉम्प्युटर क्राऊड मास्टरच्या उच्च शिक्षणासाठी गेले वर्षभर वास्तव्यास होती.अनुकूल परिस्थिती मद्धे शिक्षण घेत पदवी प्राप्त करून पनवेल च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून समाजातील सर्व स्थरातून कु. देवश्री वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पनवेल येथील पिल्लई महविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स चे शिक्षण पूर्ण केल्यावर अजून पुढचं शिक्षण करण्याची जिद्द उराशी बाळगून परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रचंड परिश्रम करून आयर्लँड येथील डब्लीन युनिवरसिटी मद्धे क्राऊड कॉम्प्युटरसाठी प्रवेश घेतला.त्या नंतर कठोर परिश्रम करत मास्टर डिग्री संपादन करून परिवाराचे स्वप्न साकार केले. हे आनंदाचे वृत्त समजताच तिच्या वर कौतुकाचा वर्षाव होत असून मा. सभागृह नेते परेश ठाकूर आणि समाजातील इतर प्रतिष्ठित व्यक्तींकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.