रविवारी नवी मुंबईत "खुशरंग संगीत महोत्सव"
हा बहारदार संगीत सोहळा वाशी बस डेपोजवळील अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता सुरू होणार असून रात्री ९ वाजेपर्यंत रसिकांना शास्त्रीय संगीताचा सुरेल आनंद घेता येणार आहे. या महोत्सवात रायगडचे सुपुत्र सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी आणि वाराणसी येथील विदुषी शिवानी आचार्य यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. यावेळी अहिल्यानगर येथील प्रसिद्ध तबलावादक विश्वास जाधव यांचे सोलो तबला वादन होणार आहे. संगीत साथ म्हणून पं. निषाद पवार, पं. विनायक नाईक यांचे तबलावादन, अभिषेक काटे व सल्ला मनोज कुमार यांचे हार्मोनियम वादन होणार आहे. त्यामुळे एकूणच हा कार्यक्रम नवोदित कलाकारांपासून ते ज्येष्ठ संगीतरसिकांपर्यंत सगळ्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.