शहीद दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहीद दिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे थोर स्वातंत्र्यसेनानी शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करून अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.