मराठी राजभाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज यांची जयंती उत्साहात साजरी; लोकप्रिय व हृदयस्पर्शी कवितांतून श्रोते झाले मंत्रमुग्ध
पनवेल (प्रतिनिधी) मराठी राजभाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 'संदीप वैभव... आणि कविता' हि वैभव जोशी आणि संदीप खरे यांच्या स्वरचित कवितांची नवी मैफिल आयोजित करण्यात आली होती. या मैफिलीला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत नाट्यगृह हाऊसफुल्ल होऊन मराठी राजभाषा दिन आणि कुसुमाग्रज यांची जयंती जणू मराठी भाषेचा गौरव उत्सव म्हणून साजरा झाला. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संदीप खरे आणि वैभव जोशी यांनी आपल्या लोकप्रिय व हृदयस्पर्शी कवितांचे सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या काव्यप्रदर्शनाला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषेला राज्याच्या अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळे, १ मे हा 'मराठी राजभाषा दिन' किंवा 'मराठी भाषा दिन' म्हणून ओळखला जातो.तसेच, २७ फेब्रुवारी हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज,यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या गौरवासाठी समर्पित आहे. १ मे हा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाल्याचा दिवस, तर २७ फेब्रुवारी हा मराठी भाषेच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदानाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. ज्याद्वारे मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रचार, प्रसार केला जातो. या दिवसाचे महत्व लक्षात घेता राज्यभरात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये साहित्यिक कार्यक्रम, व्याख्याने, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या संवर्धन आणि प्रचारासाठी यंदाही भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने ''संदीप वैभव...आणि कविता' हा एक लोकप्रिय मराठी काव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि वैभव जोशी यांनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करून विविध कवितांद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित रसिक श्रोत्यांनी वाहवा ची दाद दिली.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, शहर चिटणीस अमित ओझे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका वृषाली वावेकर, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, अमोल खेर, गणेश जगताप, चिन्मय समेळ, केदार भगत, रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, जितेंद्र वाघमारे, वैभव बुवा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.