सरपंच – माझी विधवा / परितक्त्या / घटस्फोटीत माता बहिण” योजना अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत जासई तर्फे महिलांना आर्थिक मदत
उरण दि ८(विठ्ठल ममताबादे )ग्रुप ग्राम पंचायत जासई, ता. उरण, जि. रायगड. मार्फत “ सरपंच – माझी विधवा / परितक्त्या / घटस्फोटीत माता बहिण ” योजना राबविण्यात आली. सन २०२४/२०२५ करिता १५ % मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय खर्चा अंतर्गत “सरपंच माझी विधवा / परितक्त्या / निराधार माता बहिण” योजना ग्रुप ग्रामपंचायत जासई हद्दीतील महिलांना वैयक्तीक लाभ रू. ५०००/- देण्यात आले .या कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सरपंच संतोषशेठ घरत ,उपसरपंच विनायक पाटील,ग्रामविकास अधीकारी भास्कर पालकर,ग्रुप ग्रामपंचायत जासई सर्व विद्यमान सदस्य व लाभार्थी महिला उपस्तिथ होत्या.चांगला उपक्रम राबविल्याने सर्वत्र या उपक्रमांचे व ग्रामपंचायतच्या कार्याचे कौतुक होत आहे. वेगवेगळे उपक्रम व योजना प्रभावीपणे राबवून शासनाच्या सर्व योजना सेवा सवलती शेवटच्या घटका पर्यंत, सर्व घटका पर्यंत पोहोचविण्याचे कार्य ग्रुप ग्रामपंचायत जासई ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत असल्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत जासई ग्रामपंचायतचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे.