पनवेल महानगरपालिकेच्या अटकावणी मोहिमेमुळे थकबाकीदारांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढला

पनवेल महानगरपालिकेच्या अटकावणी मोहिमेमुळे थकबाकीदारांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढला


पनवेल,दि.11 : महापालिकेच्यावतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता अटकावणी मोहीमेस जोमाने सुरूवात केल्यानंतर त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानूसार महापालिकेच्यावतीने मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरोधोत पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन व कर आकारणी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विविध जप्ती व अटकावणी पथकाच्या माध्यमातून वेगाने कारवाई केली जात असून, गेल्या चार दिवसामध्ये 25 मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणजे दररोज कोटीच्या घरामध्ये मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे.

  आयुक्तांनी दिलेल्या आदेशनूसार मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवरती प्रत्येक विभागातील वसुली पथक कारवाई करत आहे. त्यामुळे मालमत्ता करांमध्ये दिवसेदिंवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये साडेसहा कोटींचा भरणा झाला आहे. यामध्ये भारती विद्यापीठ, युनायटेड बेव्हरेज, ग्रोवेल, वेस्टर्न सुपर फ्रेश, ग्लास टेक, सहारा, अमुल या कंपन्यानी आपला बहुतांश मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य केले आहे. परिणामी या आर्थिक वर्षांमध्ये आत्तापर्यंत एकुण 358 कोटीचा मालमत्ता कर भरणा झाला आहे. 

कर अधिक्षक महेश गायकवाड तसेच कर अधिक्षक सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली जप्ती कारवाई व वसुली कारवाईसाठी मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. वसुली कारवाईला गती देण्यासाठी य वसुली टिममध्ये वाढ करण्यात आली आहे. अटकावणी कारवाई अधिक तीव्र केल्यामुळे मालमत्ता कर भरण्याकडे  मालमत्ताधारकांचा कल वाढू लागला आहे. 

महापालिकेने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेचwww. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास  1800-5320-340   या टोल फ्री क्रमांवरती संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

चौकट

थकबाकीदारांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा, अन्यथा अटकावणी कारवाईस सामोरे जावे लागेल. तसेच मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे.

उपायुक्त स्वरूप खारगे, पनवेल महानगरपालिका

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image