महापालिका उपायुक्तांच्या कारवाईची तक्रार;मुख्यमंत्री,मुख्य सचिव,पोलिस महासंचालकांचे वेधले लक्ष
wपनवेल/निर्भीड लेख वृत्त
महापालिका क्षेत्रात अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोसलेली अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत असताना नवीन पनवेलच्या केवळ दहा ते बारा मासळी विक्रेत्या महिलांवर पोलिस बळाच्या जोरावर आकसाने आणि सूडभावनेने कारवाई करून महिलांशी असभ्य वर्तन करीत असल्याची तक्रार लोकमुद्रा जनहित पार्टीने राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, लोकायुक्त, पोलिस महासंचालक, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आणि महापालिका आयुक्तांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
लाडक्या बहिणींच्या प्रेमाने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या राज्यात स्थानिक मासळी विक्रेत्या महिलांवर त्या नक्षलवादी असल्याच्या भावनेने खांदेश्वर पोलिसांच्या ताकदीवर वारंवार कारवाई करण्याचा सपाटा अतिक्रमण उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त दीपाली माने आणि सर्व विभाग अधीक्षकांनी लावला आहे.
महापालिका क्षेत्रात पाच ते सहा ठिकाणी शेकडोंच्या संख्येने मासळी बाजार रस्त्यांवर भरले जात आहेत. त्यांच्यावर एकही कारवाई केली जात नाही. वाहतुकीला अडथळे निर्माण करणारी इतर बाजारपेठा दुर्लक्षित करून केवळ नवीन पनवेल आदई सर्कल मासळी विक्रेत्या दहा ते बारा मासळी विक्रेत्यांशी असभ्य वर्तन करणे, त्यांच्या मासळीची विल्हेवाट लावणे, साहित्य जप्त करणे आणि त्यांच्यावर दहशत माजवून तेथून उठवण्याची सक्ती वारंवार केली जात असल्याने घोडके यांच्या कारवाईची चौकशी करावी तसेच त्यांची आर्थिक रसद ठरत असलेली अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, टपऱ्या, बेकायदेशीर दुकाने, अनधिकृत हॉटेल्स, होल्डिंग तसेच इतर बेकायदेशीर व्यापाराची चौकशी करून घोडके यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी लोकमुद्रा जनहित पार्टीने केली आहे.
यासंबंधी आज, मंगळवारी (ता. २५) पार्टीच्या महिला पदाधिकारी अश्विनी भोसले यांच्या नेतृत्वाखाली रेखा आंबेकर,.... आदींनी आयुक्त मंगेश चितळे यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन दिले.
हेच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक, लोकायुक्त व्ही. एम. कानडे, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नगर विकास खात्याचे मुख्य सचिव तथा रायगडचे पालक सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांना पोस्टाद्वारे पाठविले आहे.