शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांची कबड्डी सामन्यांना भेट
पनवेल : आपल्या मातीतील खेळ म्हणजे कबड्डी. शाळेपासूनच हा खेळ आपल्याला शिकवला जातो त्यामुळे आपल्याला त्याबद्दल साहजिकच आवड निर्माण होते. श्री गणेश क्लब गणेशपुर यांच्या पुढाकाराने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन बोकडवीरा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट देऊन कबड्डी सामन्यांचा आस्वाद घेतला.
यावेळी शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत श्री. महेंद्र घरत (अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस), सौ. अपर्णा मनोज पाटील (सरपंच बोकडवीरा), . ध्रुव पाटील (उपसरपंच बोकडवीरा), श्री. काका पाटील, श्री. मनोज पाटिल, श्री. श्रीकृष्ण पाटील (गणेश क्लब अध्यक्ष), श्री. धनंजय पाटील, श्री. सूर्यकांत पाटील, श्री. किशोर पाटील, श्री. यशवंत ठाकूर, श्री. चंद्रकांत पाटील, श्री. शशिकांत पाटील, श्री. राजेंद्र बाळाराम पाटील, सौ. वंदना दीनानाथ पाटील, सौ. रूपाली पाटील, सौ. शोभा पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.