छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस

 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस 



११ मार्च १६८९ हा दिवस इतिहासात धैर्य, त्याग आणि स्वाभिमान यांचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते. स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आणि अत्यंत क्रूर मुघल बादशाह औरंगजेबाशी अत्यंत धैर्याने सामना केला. आज (दि. ११) छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवशी विधानभवनात आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, पनवेल शहर भाजपचे अध्यक्ष यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.