पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार”

पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार”

पनवेल, दि.२४ (वार्ताहर) : पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या ३० वर्षाच्या पत्रकारीता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने  “व्यवसाय सेवा पुरस्कार” आणि “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार” ने त्यांना सन्मानित करण्यात आले.  

             पनवेल शहरातील सिंधी पंचायत सभागृह येथे हा सोहळा संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे दरवर्षी व्यवसाय करतानाच समाजासाठी काम करणाऱ्या एखा‌द्या सेवाभावी व्यक्तीला व्यावसायिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत असते. पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या ३० वर्षाच्या पत्रकारीता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी 3131 चे जिल्हा गव्हर्नर शीतल शाह यांच्या हस्ते “व्यवसाय सेवा पुरस्कार” आणि “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार” ने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रोटरी जिल्हा प्रथम महिला रागिणी शाह, सहाय्यक गव्हर्नर डॉ. किरण कल्याणकर, पीडीजी डॉ. गिरीश गुणे, अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, रोटेरियन आणि अनस, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल सदस्य उपस्थित होते.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image