खंडणीखोर शादाब बेगवर ब्लॅकमेलिंगप्रकरणी गुन्हा-हुक्कापार्लरवाल्याकडून केली होती 50 हजारांची मागणी


खंडणीखोर शादाब बेगवर ब्लॅकमेलिंगप्रकरणी गुन्हा-हुक्कापार्लरवाल्याकडून केली होती 50 हजारांची मागणी


पनवेल:- ट्वीटर अर्थात एक्स या समाजमाध्यमाव्दारे ब्लॅकमेलिंग करणाऱ्या दोन जणांवर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खारघर येथील हुक्का पार्लरमध्ये बेकायदेशीर कामे चालतात. ते सर्व आम्ही ट्वीट करु. ते काढायचे असेल तर पन्नास हजार रुपयांची खंडणी द्यावी लागेल असे म्हणत दोन जणांनी हुक्का पार्लरच्या मालकाला ब्लॅकमेल केले. दमदाटी करत दहा हजार रुपये खंडणी घेतली म्हणून कळंबोली येथील २३ वर्षीय युवकाच्या फिर्यादीवरुन दोन जणांविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल झाला. शादाब बेग हा परिसरातील अनेकांना वृत्त प्रसिद्ध करण्याच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचा धंदा करत होता काही दिवसापासून त्याने एक टोळी निर्माण केली होती जी ट्विटरवर बातम्या टाकून खंडणी गोळा करण्याचे काम करत होती मात्र खारघर पोलिसांनी या टोळीचा मुखीया शादाब बेग याला बेड्या ठोकल्या असून पोलिसांनी अजूनही यांच्या ट्विटरटीमची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image