शिवजयंती निमित्त 'स्पर्धा गोष्टींची'

 शिवजयंती निमित्त 'स्पर्धा गोष्टींची' 


पनवेल (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल पनवेलतर्फे 'स्पर्धा गोष्टींची' या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
       शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गटात वय २५ ते ४५ वर्षे आणि ४५ वर्षेपुढील अशा गटात हि स्पर्धा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आयुष्य, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, त्यांचे बालपण किंवा महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग यापैकी एक विषय स्पर्धकांसाठी असणार आहे. हि स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने असून त्यासाठी पाच मिनिटाची वेळ मर्यादा असणार आहे. त्या अनुषंगाने व्हिडिओमध्ये कोणतेही एडिटिंग चालणार नाही. व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख २३ फेब्रुवारी असून परीक्षण हे सादरीकरण, विषयातील स्पष्टता, चेहऱ्यावरील हाव भाव, उच्चारातील स्पष्टता या निकषांवर केले जाणार आहे. सदर व्हिडीओ bjpculturalpanvel@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवाव्यात. या स्पर्धेतील विजेत्यांना गट निहाय बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम क्रमांकास ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये,  तृतीय क्रमांकाला १ हजार रुपये, तर दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ५०० रुपये आणि सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अधिक  पाटील ९०८२४०७०८८ किंवा वैभव बुवा ९०२९४१०६९९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.