आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा दिलासा - आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!

आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा दिलासा - आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!

पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू असून, पनवेल शहरातील हजारो नागरिकांना रहिवासी पुरावा विषयात अडचण निर्माण झाली होती,रहिवासी पुराव्याच्या अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता होती.  

सामान्य कुटुंबातील विद्यार्थी या सवलतीच्या माध्यमातून शिक्षण घेतात, महाराष्ट्रातील अनेक कुटुंब पनवेल शहरात नोकरी निमित्त स्थलांतरित झाले असून, पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नसते.  पालकांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, वाहन परवाना , पासपोर्ट ही सर्व कागदपत्रे असून देखील शासनाच्या काही तांत्रिक बाबींमुळे रहिवासी पुराव्यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही गंभीर समस्या विधानपरिषद आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे यांच्यासोबत चर्चा करून तांत्रिक बाबींवर तोडगा काढला. या ठोस निर्णयामुळे पनवेल तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत शिक्षणाच्या हक्काचा प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सामान्य कुटुंबांमधील पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून, त्यांनी आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या प्रयत्नांचे मनःपूर्वक स्वागत केले आहे.