जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांना ‘दशकातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय अग्रणी’पुरस्कार प्रदान

जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांना ‘दशकातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय अग्रणी’पुरस्कार प्रदान

 


पनवेल/नवी मुंबई (प्रतिनिधी) जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांना १५ व्या एआयएमए मॅनेजिंग इंडिया अवॉर्ड्समध्ये प्रतिष्ठेच्या ‘दशकातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय अग्रणी’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार म्हणजे जेएसडब्ल्यू समूहाला जागतिक स्तरावरील मोठ्या उद्योग समूहामध्ये विस्तारण्याच्या त्यांच्या परिवर्तनात्मक नेतृत्वाला मिळालेली मान्यता आहे. 

      श्री. जिंदाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सन्माननीय अतिथी म्हणून वाणिज्य आणि उद्योगइलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचे राज्यमंत्री जितिन प्रसाद उपस्थित होते. पुरस्काराच्या सन्मानपत्राचेवाचन केपीएमजी इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यझदीनागपोरेवाला यांनी केले.

           श्री. जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली जेएसडब्ल्यू समूहाने उल्लेखनीय वाढ साध्य केली असून कंपनीचे उत्पन्न दुपटीहून अधिक वाढून २४ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचले आहे. त्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनामुळे  जेएसडब्ल्यूने वार्षिक स्टील उत्पादन क्षमता जवळपास तिप्पट करून ३९ दशलक्ष टनांपर्यंत वाढवली आहे. तसेच जेएसडब्ल्यूने अक्षय ऊर्जा आणि सिमेंट उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. या पुरस्कारातून जेएसडब्ल्यू समूहाला भारताच्या पायाभूत सुविधा आधुनिकीकरण उपक्रमांशी जोडण्यात असलेली श्री. जिंदाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली, जेएसडब्ल्यू भारतातील खाजगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी पोर्ट ऑपरेटर कंपनी म्हणून उदयास आली आहे. तसेचकंपनीने आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे इलेक्ट्रिक वाहन आणि लष्करी ड्रोन यांसारख्या भविष्यातील क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन मॅनेजिंग इंडिया अवॉर्ड्स भारताच्या व्यावसायिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा सन्मान करतात. या पुरस्कार सोहळ्याच्या १५ व्यासत्रासाठी विविध नामांकित पुरस्कार विजेतेउद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि  एआयएमएचे पदाधिकारी एकत्र आले होते.