रामशेठ ठाकूर मैदानाचे महेंद्र घरत यांच्या हस्ते उदघाटन;गव्हाणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

रामशेठ ठाकूर मैदानाचे महेंद्र घरत यांच्या हस्ते उदघाटन;गव्हाणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी




पनवेल (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यात खूप कष्ट उपसले, त्यांनी फक्त रयतेचाच विचार केला, त्यामुळे सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत, असे प्रतिपादन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उलवा नोड येथे आज (दि. १९) केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा गव्हाण-कोपर येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यावेळी रामशेठ ठाकूर बोलत होते.  उलवा नोडमधील सेक्टर १२ मधील प्लॉट क्रमांक ६ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल जवळील असलेल्या मैदानाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्यात आले असून या रामशेठ ठाकूर मैदानाचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते झाले. 
          यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, समितीचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, रघुनाथशेठ घरत, माजी सरपंच वसंत म्हात्रे, रामदास ठाकूर, माजी सरपंच माई भोईर, वसंत पाटील, विभागीय अध्यक्ष विजय घरत, जयवंत देशमुख, अमर म्हात्रे, विश्वनाथ कोळी, भार्गव ठाकूर, अंकुश ठाकूर, वामन म्हात्रे, रतन भगत, कमलाकर देशमुख, बाबुराव कांबळे, अनिल देशमुख, सुधीर ठाकूर, अशोक कडू,शेखर देशमुख, किरण देशमुख,सरिता कोळी, अश्विनी ठाकूर ,हेमलता ठाकूर, इशा देशमुख, शिवानी रॉय ,वर्षा देशमुख, मानसी देशमुखसाईचरण म्हात्रे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
       यावेळी बोलताना अश्वारूढ पुतळ्याच्या आरक्षित जागेसाठी महेंद्र घरत तसेच इतर सहकाऱ्यांनी चांगले प्रयत्न केलेत, म्हणूनच लवकर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आकारास येईल आणि त्या अनुषंगाने गव्हाणजवळ लवकरच शिवसृष्टी उभी राहील" असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितले. या शिवजयंती उत्सवात ओवी देशमुख, स्वरा ठाकूर, त्रियांश मोकल या चिमुकल्यांनी शिवरायांवर केलेल्या भाषणाने आणि उलवा वारियर्स ग्रुपने लाठी-काठी, तलवारबाजीच्या कसरतीने मान्यवरांची मने जिंकले. अंगावर रोमांच उभे राहिले. यावेळी  बालकलाकारांनी सादर केलेल्या अभूतपूर्व कलेला प्रोत्साहन म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी २० हजार रुपये बक्षीस दिले .
         
'रामशेठ ठाकूर मैदान'चे लोकार्पण 
सन २०१७-१८ सालापासून या मैदानावर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य अश्वारूढ पुतळा उभारणी आणि विविध कार्यक्रमे
सभा  इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मैदान व्हावेयासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोकडे सतत पाठपुरावा करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी असलेल्या मैदानाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचा ठराव दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेऊन तो पारित झाला होता.  आता या मैदानाचे नामकरण शिवजयंतीच्या पवित्र दिवशी झाले असून हे मैदान रामशेठ ठाकूर मैदान या नावाने ओळखले जाणार आहे.  लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रत्येक समाजात कार्य आहे. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आपले आयुष्य खर्ची केले आहे.  लोकनेते रामशेठ ठाकूर हे मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. राजकीय चपला बाजूला सारून ते समाजासाठी काम करत असतात, सढळ हस्ते मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ५० वर्षांहून अधिक काळापासून करीत आले आहेत. त्यामुळे त्यांना दानशूर व लोकनेते हि उपाधी लोकांनी प्रदान केली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर स्थानिकांच्या हक्कासाठी लढणारे नेते अशीही त्यांची आणखी एक ओळख सर्वश्रुत आहे. त्यामुळे उलवा नोड मध्ये उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या अनुषंगाने येथील मैदान लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने ओळखले जाणार असून येथील शिवसृष्टी आणि हे मैदान विभागाच्या नावलौकिकात भर टाकणारे ठरणार आहे.