पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मयूर तांबडे

 पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मयूर तांबडे 


नवीन पनवेल : पनवेल-नवी मुंबई प्रिंट, डिजिटल पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा मयूर गुरुनाथ तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी मयूर तांबडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

        पनवेल येथील लालचंद यादव यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून मयूर तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून दीपक कांबळे, सचिव म्हणून लालचंद यादव तर खजिनदार म्हणून मिलिंद खारपाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पनवेल- नवी मुंबई प्रिंट, डिजिटल पत्रकार संघटना ही सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करते. यापूर्वी संघटनेच्या वतीने गरीब मुलामुलींना 33 सायकलचे वाटप तसेच दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेवेळी स्वागत करणे, धामोळेवाडी येथील मुला मुलींना खाऊ आणि ब्लॅंकेट वाटप करण्यात आले होते. अशाच प्रकारे यापुढे देखील अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतील असे अध्यक्ष मयूर तांबडे यांनी सांगितले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सल्लागार रमेश भोळे, अनिल कुरघोडे, अण्णासाहेब आहेर उपस्थित होते. दीपक घरत, दीपक जगे, समीर वेशवीकर, अशोक गोरडे, पंकज तांबडे संघटनेचे सदस्य आहेत.