आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून तत्परतेने ठाणा नाका हायवेवर रंबलर टाकून घेण्यात आले

आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून तत्परतेने ठाणा नाका हायवेवर रंबलर टाकून घेण्यात आले

पनवेल/प्रतिनिधी,दि.१८

ठाणा नाका हायवेवर गार्डन हॉटेल ते नवीन महापालिका ईमारत या भागात रात्री दुर्घटना होण्याच्या संख्येत वाढ झाली होती.रात्रीच्या वेळेत वाहन चालकांना या महामार्गावरील वळणाचा अंदाज येत नसल्याने समोर असलेल्या झाडावर आदळत होते,त्यामुळे अनेक वाहन चालक जखमी होत होते.या बाबतची माहिती मिळताच वाहतूक विभाग आणि एम एम आर डी ए (MMRDA) च्या अभियंतांशी चर्चा करून या महामार्ग अंतर्गत भागात रंबलर टाकून घेण्यासाठी सांगण्यात आले जेणेकरून वेगात येणाऱ्या वाहनांचा वेग कमी होईल आणि दुर्घटना होण्याची शक्यता जीकमी होऊ शकेल.आज गार्डन हॉटेल ते नवीन महानगरपालिका कार्यालय या भागात तीन ठिकाणी रंबलर टाकून घेण्यात आले.आमदार विक्रांत पाटील यांनी तत्परतेने या विषयात लक्ष घातले याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहे.