पनवेलमध्ये शिवरायांना मानाचा मुजरा

 पनवेलमध्ये शिवरायांना मानाचा मुजरा



 अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेल महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, शहर अध्यक्ष अनिल भगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, मुकीत काझी, भाजपच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शहरात हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत भव्य मिरवणुक झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळा टपाल नाका येथे या मिरवणूकीचा समारोप झाला. श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने पनवेल शहरात महाराजांच्या पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.