प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संघटन पर्व आढावा बैठक संपन्न

 प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संघटन पर्व आढावा बैठक संपन्न 


लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार  

पनवेल (प्रतिनिधी) उरण विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटन पर्व आढावा बैठक पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाली. या बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी उरण परिसरात सुरु असलेल्या सदस्यता नोंदणीचा आढावा घेत सदस्यता मोहिमेला अधिक गती देण्याच्या दृष्टीने प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने गावागावात आणि घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधत त्यांना भाजपा परिवारात सामील करून घ्यावे, असे आवाहन केले. 
       या बैठकीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल रविंद्र चव्हाण यांचा सत्कार केला. या बैठकीला आमदार प्रशांत  ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, दिपक बेहरे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुका अध्यक्ष प्रविण मोरे, जिल्हा चिटणीस रुपेश धुमाळ, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, युवामोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, मोतीराम ठोंबरे, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण,