बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी, इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन आणि नॅशनल प्रधान मुख्य सरपंच संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय परिसंवाद व पुरस्कार वितरण सोहळा
पणजी/प्रतिनिधी
16 फेब्रुवारी 2025 रोजी पणजी, गोवा येथे बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी, इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन आणि नॅशनल प्रधान मुख्य सरपंच संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय परिसंवाद व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लॉर्ड गौतम बुद्ध यांच्या प्रतिमापूजनानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटन माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात देशभरातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 200 हून अधिक व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. प्रथमेश आबनावे यांना "राजीव गांधी नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025" मिळाला. बाळकृष्ण कांबळे यांना "संत शिरोमणी रोहिदास महाराज राष्ट्रीय पुरस्कार" तर डॉ. सुनील लोखंडे यांना "एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांना "डॉ. बी.आर. आंबेडकर लाईफटाईम अचिव्हमेंट नॅशनल अवॉर्ड" देण्यात आला. मणिपूरमधील 18 हून अधिक व्यक्तींना विशेष सामाजिक सेवेबद्दल पुरस्कार देण्यात आले. डॉ. विजय मोरे, संतोष पांचाळ, अमित साबळे, देवयानी पालवे, प्रदीप पासवान यांनाही विविध राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
सामाजिक समता आणि संविधानासमोरील आव्हानांवर परिसंवाद पार पडला, ज्यात अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून 250 हून अधिक सेवा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आर्ट्स अँड कल्चरल डिपार्टमेंट, गोवा आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्राध्यापक गोरख साठे आणि डॉ. बी. एन. खरात होते. राष्ट्रीय एकता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्ये यांचा प्रचार हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.