मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.

मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.

बारामती(साप्ताहिक जनसभा खारघर नवी मुंबई विशेष प्रतिनिधी)

लातूर चे माजी खासदार तथा सुप्रीम कोर्ट चे ॲडव्होकेटे संसद रत्न प्रोफेसर डॉक्टर,ॲडव्होकेट सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक फाउंडेशन महागांव यवतमाळ यांच्या वतीने डोरली यवतमाळ येथे पहिली राज्यस्तरीय जेतवन बौद्ध धम्म परिषद मध्ये स्मृती चिन्ह मानपत्र पुरस्कार देऊन सत्कार करून गौरव करण्यात आला.

लातूर चे लोकप्रिय संसद रत्न माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर ॲडव्होकेट 

डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी सामाजिक,शैक्षणिक,साहित्यिक बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व आंबेडकरी चळवळी मध्ये सक्रिय सहभाग,लेखक,कवि,पत्रकार,संपादक,राजकीय नेता आणि खासदार म्हणून केलेले लातूर लोकसभा मतदार संघातील कामे, अनुक्रमे दोनशे बेड चे सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पासपोर्ट सेवा केंद्र,NEET Exam सेंटर,नेशनल हाईवे,अनेक नवीन रेल्वे सुरू, पिट लाईन,रेल्वे स्टेशन चे आधुनिकीकरण,हिंदी लायब्ररी,उदगीर,लातूर रोड,लातूर रेल्वे स्टेशन वर नवीन प्लेटफॉर्म,तिन्ही ठिकाणी रेल्वे दादरा,खासदार फंड मधून रेल्वे स्टेशन वर प्रवाशांना बसण्यासाठी स्टील चे खुर्ची सोफा,लातूर रेल्वे स्टेशन वर व्हीआयपी लाउंज,रेल्वे बोगी कारखाना,जलयुक्त शिवार कामासाठी खासदार निधीतून करोडो ची कामे,रेल्वे नी पाणी आणले,लातूर शहरात खासदार फंड मधून १०० बोरवेल दिले,लातूर शहरात महिला आणि पुरूष साठी स्वच्छता गृह उभारले, खासदार फंड मधून शहरात सिटी बस चा थांबा बांधून दिला,सांसद आदर्श ग्राम अनसरवडा चा संपूर्ण विकास केला,जवळपास ७०० गावांमध्ये वेगवेगळ्या कामा साठी खासदार निधी दिला,कैंसर आणि हार्ट पेशंट ला प्रधानमंत्री यांच्या कडून जवळपास करोडो पेक्षा ज्यास्त मदत केली,दीडशे पेक्षा ज्यास्त वकिलांना भारत सरकार कडून नोटरी बनविण्यासाठी शिफारस करून नोटरी बनवले,लातूर शहरातील ब्लैक स्पॉट बंद केले,टेंभुर्णी रस्त्या साठी अनेक वेळा लोकसभेत मागणी केली,रत्नागिरी नागपूर हाईवे सुरू व्हावा यासाठी लोकसभेत मागणी केली,अनेक अनाथ मुला मुलीना मदत केली,गरीब मुलाना शिक्षणासाठी मदत केली,अशा सर्व कामाची दखल घेऊन पहिली राज्यस्तरीय जेतवन बौद्ध धम्म परिषद डोरली यवतमाळ येथील भव्य कार्यक्रमात बुद्धिस्ट गोल्डमन रोहित पिसाळ यांच्या हस्ते अवार्ड देऊन डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला जेतवन बुद्ध विहार चे संस्थापक रमेश बनसोड, बुद्धिस्ट उद्योजक रोहित पिसाळ,संयोजक धम्मसेवक भैया साहेब पाईकराव,अशोक निकाळजे,सुधाकर लोमटे,डॉ उत्तम शेंडे,प्रशिक पाईकराव,आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर ,महिलांची संख्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

संसद रत्न माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image