राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्थेच्या 41 व्या क्रीडामहोत्सवाचे संस्थेचे संचालक डॉ. बी. वी. रामकुमार यांच्या हस्ते भव्य उद्‌घाटन

राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्थेच्या 41 व्या क्रीडामहोत्सवाचे संस्थेचे संचालक डॉ. बी. वी. रामकुमार यांच्या हस्ते भव्य उद्‌घाटन


खारघर: राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, प्रादेशिक केंद्र, नवी मुंबईच्या 41 व्या क्रीडामहोत्सवाचा उद्‌घाटन सोहळा खारघर, नवी मुंबई येथील संस्थेच्या प्रांगणात मंगळवार, दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी  मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ. बी. वी. रामकुमार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ रवी प्रकाश सिंग उपस्थित होते.

या क्रीडामहोत्सवामध्ये विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांसह विविध मान्यवर आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संस्थेच्या वतीने आयोजित या स्पर्धांचे मुख्य उद्दिष्ट बौद्धिक दिव्यांग व्यक्तींमध्ये क्रीडा आणि शारीरिक सक्षमता विकसित करणे तसेच समाजामध्ये समावेशकतेला चालना देणे आहे.

यावेळी संस्थेचे संचालकांनी आपल्या मनोगतातून क्रीडेमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते तसेच दिव्यांग व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढतो, असे मत व्यक्त केले. या क्रीडा महोत्सवामध्ये प्रशिक्षणार्थी, बौद्धिक दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक आणि संस्थेचे कर्मचारी यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा क्रीडा महोत्सव 4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी स्पर्धक, पालक, व्याख्याता, आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image